Dapchari News | दापचरी प्रकल्पाचा अहवाल सादर करा

- म. टा. प्रतिनिधी। मुंबई

डहाणू तालुक्यातील दापचरी दूध डेअरी प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य झाला असे कोणालाच स्पष्टपणे सांगता येणार नाही. तेथील सध्याची नेमकी परिस्थिती काय आहे याचा अहवाल १५ दिवसात तयार करण्याच्या सूचना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी, अल्पभूधारक आणि भूमीहीन शेतकऱ्यांना आथिर्कदृष्ट्या सक्षम करण्यासाठी १९७४ साली दापचरी प्रकल्प सुरू झाला. प्रकल्पासाठी सरकारने ताब्यात घेतलेल्या जमिनीचा मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला? दापचरी धरणाच्या पाण्याचा वापर कसा व कुणासाठी होतो. प्रकल्पग्रस्त ३४ वर्षापासून हक्कांसाठी झगडतात. त्यांच्यासाठी काय करता येईल, याचा अहवाल द्यावा, असे पालकमंत्र्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कृष्णा घोडा यांच्या अध्यक्षतेखालील दापचरी कृषीक्षेत्र संघर्ष समिती व दापचरी दूध प्रकल्पग्रस्तांनी मंत्रालयात नाईक यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीस डहाणू प्रांत अधिकारी माया पाटोळे तसेच कृषी अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Reach us at facebook